1. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूटचे प्रा. लि. यांचे ध्येय :-
"शेतकरी वर्गाचा उत्पादनासाठी होणारा खर्च कमी करून, उत्पादनात वाढ करणे."
2. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. हे ॲप एक व्यायवसायिक ॲप असून, हे वापरण्यापूर्वी नियम व अटी काळजीपूर्वक वाचणे बंधनकारक आहे. हे ॲप वापरणारा किंवा इतर कुठलीही व्यक्ती, संस्था किंवा इतर कोणालाही ह्या ॲप मधील नमूद केलेल्या नियम व अटी ॲप डाउनलोड / Install केल्यापासून लागू असतील याची नोंद घ्यावी.
3. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. हे ॲप फक्त सज्ञान व्यक्तींसाठी आहे, आम्ही कोणत्याही अज्ञान व्यक्तीस सेवा पुरवीत नसल्याची नोंद घ्यावी.
4. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. ॲपच्या चांगल्या प्रकारच्या वापरासाठी आपल्याकडून आम्हास आपले स्थान, दूरध्वनी क्रमांक व गरज पडल्यास तर माहिती देणे अनिवार्य आहे, यासाठी लागणाऱ्या इतर कुठल्याही प्रकारच्या खर्चाची जबाबदारी हि ॲप वापरकर्त्यांची असेल याची वापरकर्त्यांनी नोंद घ्यावी.
5. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. ॲप च्या गुणवत्तेवर इंटरनेट सेवेचा होणारा परिणाम किंवा संगणक विषाणू किंवा इतर, हा डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट प्रा. लि. च्या नियंत्रणाबाहेरील असून यावर इतर बाहेरील घटकांचा परिणाम होऊ शकतो याबाबत डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिट्यूट प्रा. लि. जबाबदार राहणार नाही.
6. आपण आम्हास जी काही माहिती देतात आम्ही त्याचे कौतुक व आदर करतो व ती माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही बाबतीत इंटरनेटद्वारे काम करत असताना ती पूर्णतः सुरक्षित असतेच असे नाही, म्हणून आम्ही त्याची हमी घेत नाही.
7. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. हे ॲप काही बाबतीत काही संस्थांन कडून सेवा घेते, त्या बाबतीत त्या संस्था आपली माहिती घेऊ शकतात.
8. काही विशिष्ट कारणामुळे डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. ॲप हाताळत असताना नेटवर्क मधील समस्या, अपयश यामुळे होणाऱ्या कुठल्याही नुकसानीस डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. जबाबदार राहणार नाही.
9. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. ॲप वर दिली जाणारी माहिती हि वेगवेगळ्या प्रत्येक्ष, अप्रत्यक्षरीत्या प्रयोगातून व संग्रहातून घेतलेली आहे. आम्ही देत असलेली माहिती पूर्णतः आम्ही खात्री केलेली असली तरीही ती पुर्ण अचूक व एका विशिष्ट हेतूने वापरण्यासाठी योग्यच असल्याची हमी आम्ही देत नाही.
10. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. ॲप मध्ये दाखवलेली /उल्लेख केलेला / सल्ला दिलेल्या उत्पादनांचा पिकांवर होणाऱ्या परिणामासंबंधी डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. कुठलीही हमी घेत नाही.
11. आम्ही आश्वासन देतो कि कुठलीही माहिती उपलब्ध करून देताना आम्ही आमचे अनुभव, संशोधन, अभ्यास आणि कौशल्य पणास लावू. भविष्यात ॲप मध्ये होणारी देखभाल, आपत्कालीन परिस्थितीत आम्ही तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करू, तरी सुद्धा कुठल्याही कारणास्तव ॲप उपलब्ध नसल्यास यासाठी डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. जबाबदार राहणार नाही.
12. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. ॲप हे आपणासाठी काही बाबतीत निशुल्क असून, आपणास पाहिजे असल्यास आपण शुल्क भरून अधिक माहिती मिळवू शकतात. तसेच सदरचे ॲप हे डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. या कंपनीच्या मालकीचे असून यात कोणताही आणि कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही.
13. काही कारणास्तव आमच्याकडून घेतलेल्या सेवा रद्द केल्यास भरलेली मार्गदर्शन फी / शुल्क कुठल्याही परिस्थितीत / सबबीवर परत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
14. द्राक्ष निर्यात करतांना द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, जि. पुणे यांनी दिलेल्या परिशिष्ट ५ चा वापर करावा. तसेच तुमचा द्राक्ष नमुना फेल / नापास झाल्यास डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. याची कुठलीही जबाबदारी स्वीकारणार नाही.
15. तुम्ही दिलेल्या शुल्क / फि बद्दल प्रत्येक पिकाच्या डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि.ने ठरविलेल्या शुल्कानुसार तुम्हाला डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. मार्फत सेवा दिल्या जातील.
उदा. वर्षभर आपण द्राक्ष संदर्भात सेवा घेतल्यास -
• खरड छाटणीत, प्लॉट छाटणीच्या तारखेनुसार शेड्युल मिळेल.
• आपल्या बागेतील समस्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवू शकता व त्यावर आपणास आमच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.
• मातीपरीक्षण अहवालानुसार आपल्याला प्लॉटचे अन्नद्रव व्यवस्थापन दिले जाईल.
• आपल्या गावानुसार हवामान अंदाज मिळेल.
16. आपण रजिस्टर केलेल्या प्लॉटचे वेळापत्रक पुढील २४ तासांत आपणांस प्राप्त होईल.
17. आपणांस पुढील वेळापत्रक मिळविण्याकरिता प्लॉटचे, चांगल्या प्रतीचे फोटो "दिलेल्या तारखेला सकाळी ९ ते दुपारी १" ह्या वेळेत पाठविणे बंधनकारक आहे.
18. फोटो प्राप्त झाल्याशिवाय पुढील वेळापत्रक मिळणार नाही, फोटो पाठविण्यास उशीर झाल्यास पुढील वेळापत्रक हे २ दिवस उशिरा मिळेल, कृपया याची नोंद घ्यावी.
19. आपणांस दिलेल्या वेळापत्रकासंबंधी काही शंका / अडचणी असल्यास, मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये "प्रश्न विचारा" ह्या पर्यायाचा वापर करावा.
21. आम्ही आपणास विनंती करतो कि, आपल्याला हव्या असणाऱ्या परिणामासाठी देण्यात येणारे वेळापत्रक हे काटेकोरपणे पाळावे.
22. जर वापरकर्ता या नियम व अटी साठी सहमत नसेल तर ॲप वापरकर्त्याने ॲप चा वापर व डाउनलोड त्वरित रद्द करावे.
23. मी वापरकर्ता म्हणून आपण नमूद केलेल्या सर्व नियम व अटींशी सहमत असून त्या काळजीपूर्वक वाचून व समजून घेऊन त्याचा स्वीकार करत आहे.
24. डॉक्टर किसान बायो रिसर्च इन्स्टिटयूट प्रा. लि. कार्यालयीन कामकाजाची वेळ हि "सोमवार ते शनिवार सकाळी ९:३० ते ६:०० वा. असून साप्ताहिक सुट्टी - रविवार हि आहे. तरी आपण कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आम्हांस सहकार्य करावे हि विनंती.